काटोलचा अभिमान! साक्षी कुमेरियाने नागपूरमध्ये मेकअप टास्कमध्ये मारली बाजी

आकाश बेहनिया / काटोल
नागपूर, दि. 29 मार्च: नागपूर येथील अमृत भवन येथे Angel Ladies Club यांच्या वतीने महिला दिनानिमित्त “एक नारी सब पे भारी – सीझन 2” या भव्य पुरस्कार सोहळ्याचे तसेच होळी मिलन सेमिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

  • Save

या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरल्या त्या कटोल येथील साक्षी सुरेश कुमेरिया. त्यांनी पुणे येथे hair आणि makeup मध्ये व्यावसायिक शिक्षण घेतले असून, गेल्या 4 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

कार्यक्रमातील मेकअप टास्कमध्ये 20 मिनिटांत मॉडेल तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते. मात्र साक्षी कुमेरिया यांनी केवळ 8 मिनिटांतच आपली मॉडेल प्रिया नागदेवे यांना आकर्षक पद्धतीने तयार करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच त्यांनी महिलांना उपयुक्त असे beauty tips देखील दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

  • Save

यावेळी साक्षी कुमेरिया यांनी तरुणांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, “स्वप्न मोठं ठेवा आणि मेहनत प्रामाणिक ठेवा, यश नक्की मिळतं.” तसेच येत्या काळात ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची academy सुरू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत, academy आणि entrepreneur बनण्याच्या प्रवासात प्रत्यक्ष अनुभव घेत त्या पुढे जात आहेत. या अनुभवाच्या बळावर लवकरच मोठ्या academy ची उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची नवी संधी मिळणार आहे.

तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सीमा कोठारी, रितुजा जैस्वाल, शाची मल्लिक यांची उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात राधा-कृष्ण जोडी स्पर्धा, रेट्रो लुक फॅशन शो, तसेच वन मिनिट गेम शो यांसारख्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सहभागींसाठी गिफ्ट हॅम्पर्सचीही व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे आयोजन Angel Ladies Club च्या संचालिका सविता असावा यांनी केले होते. मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • Save

काटोलसारख्या ग्रामीण भागातून मोठं स्वप्न पाहत साक्षी कुमेरिया यांनी सिद्ध केलं की जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर कोणतंही यश दूर नसतं. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link