कन्हान येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” संपन्न

शासनाच्या योजना फक्त कागदावर नसून त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी आहेत – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

३०० लाभार्थ्यांनी विविध विभागांच्या सेवांचा लाभ घेतला

  • Save

कन्हान – आज दिनांक १५ मे २०२६ रोजी नगर परिषद कार्यालय, कन्हान येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आशिष जयस्वाल म्हणाले,”शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा तसेच गरजू कुटुंबांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न शासन करीत आहेत तसेच शासनाच्या योजना फक्त कागदावर नसून त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी आहेत असे
नमूद केले.

  • Save

दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी गावागावांत जाऊन लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येत असून शेतकरी व शेतमजुरांच्या हितासाठीही विविध निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगितले. कन्हान आणि परिसरातील रस्ते, मूलभूत सुविधा तसेच विकासकामांना गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही नमूद केले.

अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न थेट ऐकून त्यांचे निराकरण करण्यास मदत होते. भविष्यातही अधिकाधिक लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे सांगितले.

  • Save

यावेळी रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना व इतर अनेक योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेशांचे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

उपस्थितीमध्ये नगर परिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, उपाध्यक्ष रिंकेश चौरे, तहसीलदार सुरेश वाघचौरे, बंडू तळवेकर तसेच नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link