ऑटोची ऑटोला धडक, दोन जखमी; महिला नागपुरला रेफर

कन्हान (suneel sarode) :– कन्हान–तारसा मार्गावर सिहोरा मोडजवळ शुक्रवारी (दि.२४ ऑक्टोबर) सायंकाळी दोन ऑटोची समोरासमोर धडक होऊन दोन प्रवासी जखमी झाले. या अपघातात एका ऑटोचे अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, कन्हान पोलिसांनी आरोपी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खाजगी ऑटोचालक मोहम्मद युसूफ अब्दुल अजीज (६८, रा. खदान नं.३) हे आपल्या एमएच ४० पी १९१५ या ऑटोने ओळखीच्या व्यक्तींना घेऊन सिहोरा येथे जात होते. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सिहोरा मोडवरून येणाऱ्या एमएच ४९ एआर ४३६५ या दुसऱ्या ऑटोने समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रवासी प्रताप मोतीराम मेश्राम (६५) आणि कल्पना राजेश मेश्राम (४५, दोघे रा. सिहोरा) जखमी झाले. कल्पना मेश्राम यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मेयो हॉस्पिटल, नागपूर येथे रेफर करण्यात आले.
या धडकेत ऑटोचा उजव्या बाजूचा भाग तुटून अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. आरोपी ऑटोचालकाने बेपर्वाईने आणि वेगाने वाहन चालविल्याने अपघात झाल्याचे फिर्यादीने सांगितले.कन्हान पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link