नाकाबंदीत ५.८७ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

कन्हान : शहरातील जुने पोलीस स्टेशन परिसरात लावलेल्या नाकाबंदीत कन्हान पोलिसांनी मोठी कारवाई करत ५.८७ किलो गांजासह दोघांना अटक केली. या कारवाईत जवळपास १ लाख ९७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • Save

पोलिसांनी संशयित हालचालींच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सुमारास नाकाबंदी केली होती. दरम्यान, एमएच ४० एजी ४२७६ क्रमांकाच्या शाइन दुचाकीवरून जाणारे दोन इसम संशयास्पद हालचाल करताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील शाळेच्या बॅगेत ५.८७ किलो गांजा आढळून आला.

  • Save

या कारवाईत १ लाख १७ हजार १८० रुपये किंमतीचा गांजा, एक अँड्रॉइड मोबाईल (१० हजार रुपये), एक कीपॅड मोबाईल (५०० रुपये) तसेच ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ९७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • Save

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शैलेश बंसीलाल अकोने (वय ४०, रा. पिपरी-कन्हान) व निलेश उर्फ बिट्टू रमेश भुते (वय २८, रा. महाजनवाडी, टेकडी) यांचा समावेश आहे. दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम ८(क), २०(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Save

ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे, पोहवा हरीश सोनभद्रे, अमित यादव, अनिल यादव, आकाश खोब्रागडे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे कन्हान परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link