कन्हान-पिपरी नगरपरिषद व कांद्री नगरपंचायतीच्या नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा गौरव
पत्रकार दिनाचे औचित्य साधून ग्रामीण पत्रकार संघ, कन्हान यांच्या वतीने कन्हान–पिपरी नगरपरिषद तसेच कांद्री नगरपंचायतीतील नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा मंगळवार (दि. ६ जानेवारी २०२६) रोजी डोणेकर सभागृह, कन्हान येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अधिकारी सचिन गाढवे, डॉ. वैष्णवी जगताप (वैद्यकीय अधिकारी), कन्हान नगरपरिषद नगराध्यक्ष मा. राजेंद्र शेंद्रे, कांद्री नगरपंचायत नगराध्यक्ष मा. सुजित पानतावणे, सुभेदार मेजर प्रविण सतदेवे ग्रामीण पत्रकार संघाचे मार्गदर्शक मा. नारायण मालवीय सर, अजय त्रिवेदी सर, तसेच जिल्हा उपाध्यक्ष मा. शरद डोणेकर सर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कन्हान नगरपरिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष मा. राजेंद्र शेंद्रे व २० नगरसेवक, तसेच कांद्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा. सुजित पानतावणे व १७ नगरसेवक-नगरसेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार भारतीय संविधान व कायद्याच्या चौकटीत, पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख पद्धतीने राबवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
यावेळी सर्व नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. तसेच सकाळ वृत्तपत्राचे कॅलेंडर देऊन नियोजनबद्ध कामकाजाच्या माध्यमातून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कन्हान नगरपरिषदेचे नवनियुक्त नगरसेवक
विनोद किरपान, प्रशांत पाटील, समशेर पुरवले, केतन भिवगडे, शिवशंकर ऊर्फ चिंटू वाकुडकर, रिकेंश चवरे, मनोज कुरडकर, हरिष तिडके, सोनू खान, शक्ती पात्रे,
नगरसेविका– योगिता भलावी, सुषमा चोपकर, निती तेलोटे, पुनम राठी, सुचिता माटे, प्रियंका ठाकूर, आशा माहतों, लता लुंढेरे, रेखा टोहणे, मौनिका पौनिकर.
कांद्री नगरपंचायतीचे नवनियुक्त नगरसेवक – नगरसेविका
नगरसेवक – चंद्रपाल महाजन, शिवशंकर चकोले, उमेश वाडीभस्मे, धर्मेंद्र सरोदे, सिताराम नाटकर, अतुल हजारे, राकेश लांजेवार, निकेश मेश्राम.
नगरसेविका – मिनाक्षी भुते, सविता राऊत, शुभांगी कुंभलकर, माधुरी मस्के, आरती कोटपल्लीवार, रीता मस्के, संघामित्रा डोंगरे, रोशनी गजभिए, नितु परते.
कार्यक्रमाला ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य नारायण मालवीय, अजय त्रिवेदी, मोतीराम राहते, शांताराम जळते, कमल यादव, सुनील सरोदे, ऋषभ बावनकर, आकाश पंडितकर, मोहन रंगारी, गणेश खोब्रागडे, निलेश गाढवे, वीरसिंग, सफीक शेख, जयंत कुंभलकर यांच्यासह कन्हान नगरपरिषद व कांद्री नगरपंचायतीचे सदस्य, पेपर विक्रेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. संघटनेतर्फे पत्रकारांना पेन व डायरी भेट देण्यात आली. हा सन्मान सूर्यभान चकोले (संपर्क प्रमुख, नागपूर जिल्हा) यांच्या उपस्थितीत संघटनेचे पदाधिकारी अविनाश कांबळे, सुत्तम मस्के, राजू मस्के, विलास घारपिंडे, विनोद किरपान, सुरेश कळंबे, चंद्रशेखर बावनकुळे, वामन देशमुख, राजेश पोटभरे, सुषमा मस्के, सुषमा चोपकर, मीना कळंबे व समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या समाजातील योगदानाचे कौतुक करत नवनियुक्त लोकप्रतिनिधींना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

