केरडी गावात अवैध दारूवर पोलिसांची धडक कारवाई; २७ निपा जप्त, एक आरोपी ताब्यात

केरडी गावात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली. पीआय वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करून २७ निपा देशी दारूसह आरोपी प्रवीण शेलारे याला ताब्यात घेतले आहे.

  • Save


पोलिस पथक केरडी गाव परिसरात नियमित पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरामार्फत आरोपीच्या घरात अवैध दारू साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ आरोपीच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान घरातून बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेली देशी दारूचे २७ निपा असा मुद्देमाल आढळून आला. यामुळे परिसरात अवैध दारूविक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत हवा हरीश सोनभत्रे, हवा अमित यादव, एनपीसी अनिल यादव व पीसी अश्विन जी. गजभिये यांनी सक्रिय सहभाग घेतला. जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीविरोधात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • Save


केरडी व परिसरात अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक समस्यांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. अवैध दारूविक्री, साठवणूक व वाहतुकीविरोधात अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link