नागपुरमध्ये थरारक घटना! पत्नीवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न, पती अटकेत

नागपूर: शहरातील मानकापूर परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ऑटो चालकाने आपल्या पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

  • Save

कौटुंबिक वादातून घडली धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल चेतराम देशमुख (वय ३८, आनंदनगर, जयताळा) याचे पत्नी माधुरी हिच्यासोबत वारंवार वाद होत होते. सततच्या भांडणांमुळे माधुरी ही मानकापूर येथील माहेरी राहत होती.

पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून लावली आग

  • Save

२३ एप्रिल रोजी अनिल हा आपल्या सासरी गेला होता. त्यावेळी त्याने पत्नीला “तू अजून घरी का आली नाहीस?” असा जाब विचारला. या चर्चेचे पुढे जोरदार भांडणात रूपांतर झाले. संतापलेल्या अनिलने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल पत्नीच्या अंगावर ओतले आणि लायटरच्या सहाय्याने आग लावली.

समयसूचकतेमुळे बचाव

आग लागल्यानंतर माधुरीच्या कपड्यांनी पेट घेतला. मात्र, प्रसंगावधान राखत तिने स्वतःच कपड्यांवरील आग विझवली. घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

आरोपी पती अटकेत

  • Save

या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपी अनिल देशमुख याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link