प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त; डीबी पथकाची कारवाई

कन्हान,(ता.०९)

मोजा पिपरी परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत नायलॉन मांजा जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
डीबी पथकातील हेड कॉन्स्टेबल हरीश भैय्याजी सोनमद्रे, हेड कॉन्स्टेबल अमित यादव, एमपीसी अनिल यादव तसेच पोलीस कॉन्स्टेबल जीवन विखे व आकाश शिरसाट यांनी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलाच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी शुभम भोजराज गोंडाने (रा.मोजा पिपरी) हा घराजवळ पतंग उडवत असल्याचे आढळून आले.

  • Save


पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीची शहानिशा केली असता ती प्रतिबंधित नायलॉन मांजाची असल्याचे स्पष्ट झाले. नायलॉन मांजा शासनाने बंदी घातलेला असून तो मानव, पशुपक्षी व दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त करून संबंधित युवकाला समज देत पुढे असा प्रकार करू नये, अशा सूचना देऊन सोडण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी व पालकांनी आपल्या पाल्यांना प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करू देऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link