टेकाडी (कोयला खदान), ता. पारशिवनी |
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत टेकाडी (कोयला खदान), पंचायत समिती पारशिवनी, जिल्हा नागपूर यांच्या वतीने ग्रामस्थांसाठी महत्त्वाची जाहीर दवंडी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दवंडीप्रमाणे ग्रामपंचायतीकडे थकीत असलेल्या करांवर शासन निर्णयानुसार ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांनी सन २०२४–२५ या आर्थिक वर्षाचे चालू कर तसेच थकीत कर १५ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण भरल्यास थकीत करांवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही सवलत एकदाच देण्यात येणार असून, दिलेल्या मुदतीनंतर केवळ थकीत कर भरल्यास कोणतीही सूट मिळणार नाही.
ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे की सन २०२४–२५ च्या चालू करांवर कोणतीही सूट लागू होणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी शासनाच्या या विशेष सवलत योजनेचा लाभ घेऊन ठरलेल्या कालावधीत आपले कर भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
🔴 विशेष सूचना :
ही सवलत योजना फक्त १५ जानेवारी २०२४ पर्यंतच लागू राहणार असून, त्यानंतर कोणत्याही प्रकारची करसूट दिली जाणार नाही.
सदर जाहीर दवंडी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच, ग्रामपंचायत टेकाडी (कोयला खदान), ता. पारशिवनी, जि. नागपूर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

