कार्यवाही होत नसेल तर परवान्याचे सोंग बंद करा, कन्हान फटाका व्यवसायिकांची मागणी


कन्हान : कन्हान कांद्री परिसरात दिवाळीच्या पर्वावर फटाक्यांची कोट्यावधिची खरेदी विक्री होत असून परिसरात फटाका दुकानाची 12 वैध परवाने धारक असून दिवाळी च्या कालावधीत परिसरातील तब्बल 50 ते 60 विनपरवाना (अवैध )फटाका दुकाने लावली जातात त्यातही कुठलेही सुरक्षेचे निकष पाळले जात नसल्याने कन्हान फटाका दुकानदारांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांचेकडे रीतसर तक्रार केली आहे.
कन्हान कांद्री येथील मोजके 12 फटाका दुकानदार वैध परवाने धारक असून प्रत्येक दिवाळीच्या कालावधीत त्यात 50 ते 60 दुकाने अवैध व विनपारवाना लागत असल्याने योग्य परवाना धारक व्यावसायिकानां लाखोंचा फटका दरवर्षी बसत आहे. त्यांचा अर्धाही माल विकला जात नाही व त्यात इतर विनपारवाना व्यावसायिक मजा मारत असल्याने कन्हान कांद्री येथील फटाका व्यवसायिकामध्ये प्रचंड नाराजी निर्माण होऊन शेवटचा पर्याय म्हणून उपविभागीय अधिकारी रामटेक यांचेकडे धाव घेतली व रीतसर लेखी तक्रार दिली, त्यात प्रशासनाच्या कार्यवाहीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
(प्रतिक्रिया) गौरव माहोरे (फटाका व्यावसायिक, कन्हान )
आम्ही वैध परवाना धारक फटाका दुकानदार दरवर्षी नगरपरिषद कन्हान ला 1000/- रु पावती घेऊन फटाका दुकाना करिता मागणी करतो, परंतु फटाका विक्री करिता गर्दीच्या दूर कुठेही जागा उपलब्ध करून दिल्या जात नाही, त्यामुळे सर्व फटाका व्यावसायिक भरल्या बाजारात कुठेही नियमांची पायमल्ली करून दुकानें लावतात,त्यामुळे आम्हांला प्रचंड नुकसानीला बळी पळावे लागते.

  • Save

प्रियेश महाजन (उपविभागीय अधिकारी रामटेक )
कन्हान फटाका व्यवसायिकाची तक्रार कालच आलेली आहे, त्यावर आम्ही पोलीस यंत्रनेद्वारे अवैध दुकानदारांनवर कठोर कार्यवाही केल्या जाईल व नगरपरिषद प्रशासनाने आखून दिलेल्या जागेवरच फटाका दुकान लावण्यात येईल.
दिपक घोडके (मुख्याधिकारी, कन्हान नगरपरिषद )
परिसरात फटाक्याची दुकानें कुठेही अस्ताव्यस्त लावता येणार नाहीत, सर्व परवाने धारकांनी आपले परवान्याची प्रत व अर्ज नगरपरिषद ला सादर करावा, योग्य त्या रकमेची पावती घेऊन नगर परपरिषदे कडून ठरवून दिलेल्या सुरक्षित जागेवरच फटाका दुकानें लागतील, त्याकरिता ग्रोमोर वेंचर, चर्च ग्राउंड व केमिकल ग्राउंड यापैकी जागा उपलब्ध करून देण्यात येईल व सुरक्षेचे योग्य ते निकष पाळल्या जातील.
वैजयंती मंडवधरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कन्हान )
दिवाळीच्या कालावधीत कन्हान मध्ये बाजारासाठी वेगळी जागा उपलब्ध नसल्याने मुख्य रस्त्यावरच बाजार भरत असतो, त्यामुळे वाहतुकीला फार अडचण होत असतेच, त्यात फटाका दुकाने मुख्य रस्त्यावर लागली कि वाहतुकीला बऱ्याच अडचणी येतील हे खरं. नगरपरिषद कन्हान ने फटाका दुकानदारांना जागा उपलब्ध करून दिली तर, आम्ही नक्कीच रस्त्यावरील फटाका दुकानावर कार्यवाही करू.व वाहतूक सुरळीत राहील याची काळजी घेऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link