राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्तक्षेपाने बीडीए कंपनीतील कामगारांना दिलासा

नियमित वेतनासह पीएफ, ईएसआयसी सुविधा लागू; कामगारांनी मानले आभार

पारशिवनी, ता.१० : येथील बीडीए कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिला व पुरुष कामगारांना नियमित व समाधानकारक मासिक वेतन मिळत नसल्याची बाब समोर आली होती. तसेच पीएफ, ईएसआयसीसारख्या अत्यावश्यक सुविधांचीही योग्य अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

  • Save

या पार्श्वभूमीवर संबंधित कामगारांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन आपल्या समस्या सविस्तर मांडल्या. कामगारांच्या अडचणी गांभीर्याने घेत राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी तातडीने कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून नियमित व योग्य वेतन देण्यासोबतच पीएफ, ईएसआयसी आणि इतर आवश्यक सुविधा त्वरित लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्तक्षेपानंतर कंपनी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलत सर्व कामगारांना नियमित वेतनासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आनंद व्यक्त करत आज रामटेक संपर्क कार्यालयात कामगार बंधू-भगिनींनी ॲड. आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले.

  • Save

यावेळी बोलताना ॲड. आशिष जयस्वाल यांनी कामगारांचे हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी आपण सदैव कटिबद्ध असून त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link