जिजाऊ ब्रिगेड व्दारे जागतिक महिला दिवस आणि तालुकास्तरिय अधिवेशन संपन्न

कन्हान : समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे जागतिक महिला दिवस आणि जिजाऊ ब्रिगेड तालुकास्तरिय अधिवेशन विवि ध कार्यक्रमासह थाटात संपन्न झाले.

  • Save

जिजाऊ ब्रिगेड कन्हान द्वारे जागतिक महिला दिवस आणि तालुकास्तरिय अधिवेशन समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिव मती करुणा आष्टणकर माजी नगराध्यक्षा, उद्घाटक शिवमती सुनिता जिचकार जेष्ठ मार्गदर्शक जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, प्रमुख अतिथी शिवमती जया देशमुख उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, शिवमती स्वाती शेंडे जिल्हा़ध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नागपुर, आरोग्य तंज्ञ डॉ. सुजाता मानमोडे, प्रतिमा इंगोले पोलीस कॉन्सटेब ल, डॉ. स्वाती वैद्य, डॉ. शितल माहुरे, सुनंदा दिवटे, पुनम राठी नगरसेविका नगरपरिषद कन्हान आदीच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व कांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

  • Save

पाहुण्या चे स्वागत गीताने व शॉल आणि वृक्ष देऊन स्वागत, सत्कार करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्य क्षा मायाताई इंगोले यांनी प्रास्ताविकातुन महिला दिन आणि तालुकास्तरिय अधिवेशनाचे महत्त स्पष्ट केले.

जिजाऊ ब्रिगेड महाराष्टात महिलांचे शिस्तबध्य, न्याय प्रिय आणि मोठे संघटन असल्याचे संबोधित करून जिजाऊ ब्रिगेड मध्ये बहु संख्येने सामिल होण्याचे आ वाहन कार्यक्रमाच्या उद्घाटिका सुनिता जिचकार मँडम हयानी केले.

प्रमुख अतिथी व मान्यवर महिलां तसेच जिजाऊ ब्रिगेड कन्हान सचिव छायाताई नाईक, मार्गद र्शक विशाखा ठमके मँडम आदीनी उपस्थित सर्व महि लाना मार्गदर्शन केले.

  • Save

महिलाकरिता चालण्याची स्पर्धा, रस्सीखेच, संगित खुर्ची आदी विविध स्पर्धा वयोगटा नुसार सत्तर वर्षा पर्यंतच्या महिलानी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक स्पर्धेत वेशभुषा, गीत गायन, नुत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या.

विजेत्या स्पर्धक महिला ना पाहुण्याच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई च्या जिवनावर आधारित मार्गदर्शक पुस्तक बक्षीष म्हणुन देण्यात आल्या.

कार्यक्रमास मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता येरपुडे यांनी तर आभार सविता नाटकर हयानी व्यकत केले. सर्वाना अल्पोहार वितरण करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली.

  • Save

कार्यक्रमाच्या यशस्विते करिता जिजाऊ ब्रिगेड कन्हान च्या मायाताई भोयर, लताताई जळते, प्रीती कुकडे, अल्का कोल्हे, मनिषा धुळस, वर्षा शिंगाडे, पुष्पा चिखले, लता वंजारी, प्रीती घोटेकर, गोदावरी नागरे, रंजना इगोले, उज्वला लोखंडे, आशा भोंबले, अनुपमा इंगोले, सुनंदा राऊत, सुनिता वाडीभस्मे, सुषमा बांते, मिनाक्षी भोयर, सोनम काकडे, रिना चौबे, प्रमिला वैकार, वर्षा सातपुते, सुरेखा अवच ट, संतोष खंडेलवाल, माधुरी सातपुते, श्वेता जाधव, येलकर ताई, चौधरी ताई, विद्या रहाटे, कविता खैरकर आदी महिलानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link