कलाकुंज बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेचा महिलांसाठी स्वावलंबनाचा उपक्रम

नवीन आवाज / यवतमाळ कलाकुंज बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्था, यवतमाळ यांच्या वतीने मागील पंधरा वर्षांपासून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. संस्थेच्या संस्थापिका तथा मार्गदर्शिका दुर्गा पटले यांच्या नेतृत्वाखाली हे सामाजिक कार्य अखंडपणे सुरू असून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

  • Save

संस्थेमार्फत विधवा, घटस्फोटित, एकल व गरजू महिलांसाठी ब्युटी पार्लर व शिवणकामाचे संपूर्ण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांना फक्त दोन हजार रुपयांमध्ये शिवणकाम मशीन किंवा आवश्यक सेट तसेच ब्युटी पार्लरसाठी लागणारे साहित्य देण्यात येते.

  • Save

या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वतःच्या हाताला काम मिळाले असून त्यांनी स्वतःचा छोटा उद्योग सुरू केला आहे. आर्थिक स्वावलंबनासोबतच आत्मविश्वास व सामाजिक सन्मान मिळवून महिलांचे जीवनमान उंचावण्यास हा उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहे.

  • Save

कलाकुंज बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्था भविष्यातही अशाच प्रकारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

  • Save

(शहर प्रतिनिधी : नवीन आवाज)

  • Save
  • Save
  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link