शिवमंदिरात दोन दिवसीय कार्यक्रमाने महाशिवरात्र महोत्सव उत्साहात

कन्हान, ता. १८ शहरातील स्वामी विवेकानंद परिसरातील शिवमंदिरात महाशिवरात्र निमित्त दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी (दि. १५) सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शिवपींडीचा दूध, दही व जलाने अभिषेक करून हवन-पूजन करण्यात आले. दिवसभर भाविकांनी विधिवत पूजा-अर्चना केली. भजन-कीर्तन आणि मंत्रोच्चारांनी परिसर भक्तिमय झाला होता.

  • Save

सोमवारी (दि. १६) भोलेबाबांच्या नामस्मरणाने वातावरण भारावून गेले. बाबा बर्फानीचे दर्शन तसेच स्क्रीनवरून भोलेबाबांचे थेट दर्शन दाखविण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश येळणे, राकेश भरणे, स्वप्नील मानकर, सौ. सुनिता मानकर, रोशन येलमुले, प्रविण खेकडे, राजेश कुरजेकर, प्रविण पुरे, राजाराम बडे, यश शेंदरे, गणेश भालेराव, नितेश भरणे, सोनाली येळणे, सुरज, मनस्वी भरणे आदींनी परिश्रम घेतले.

  • Save

वराडा गावात तीन दिवसीय महोत्सव थाटात

दरम्यान, वराडा येथे जय भोले शिव पंचकमेटीतर्फे शिवमंदिरात तीन दिवसीय महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रविवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता मारोतराव नागमोते यांच्या हस्ते शिवपींडीचा अभिषेक व महापूजन करण्यात आले. शिवगौरी भजन मंडळ व हरिपाठ भजन मंडळ यांचे भजन-कीर्तन झाले.

  • Save

सोमवारी (दि. १६) शारदा महिला भजन मंडळ, बाल गणेश भजन मंडळ, गुरुदेव भजन मंडळ आणि शिवगौरी मंडळ वराडा यांच्या वतीने जागृती भजन सादर करण्यात आले. मंगळवारी (दि. १७) सकाळी शिवमंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. गावभर भ्रमण करून पालखीचे मंदिरात समापन करण्यात आले. पालखीत महिला व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • Save

यानंतर ह.भ.प. श्री पांडुरंगजी महाराज मुरुमकर यांचे काल्याचे कीर्तन, दहीकाला आणि भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात गावातील महिला व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम नागमोते, स्वप्निल वरखडे, हर्षल नेवारे यांच्यासह महिला व पंचकमेटी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link