कन्हान-पिपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन

“इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती,” या घोषवाक्याने दुमदुमलेल्या वातावरणात कन्हान-पिपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याची उत्साहात सुरुवात झाली. शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी मध्यरात्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विधिवत स्थापना करण्यात आली.

  • Save

कन्हान त्यानंतर सकाळी १० वाजता तारसा रोड चौक, कन्हान येथे पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे, कन्हान नगरपरिषदेचे अध्यक्ष राजेंद्र शेंद्रे व सामाजिक कार्यकर्त्या मीना कळंबे यांच्या हस्ते महाराजांना मानवंदना देण्यात आली.

  • Save

या वेळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी पंकज लोखंडे, जीवन मुंगले, संदीप कुकडे, नगरसेवक चिंटू शिवशंकर वाकुडकर, पत्रकार सुनील सरोदे, आनंद इंगोले, अमोल देवुडकर, संजय शेंद्रे, शंकर कोंगे, अमोल डेंगे, शैलेश शेळके, गणेश मस्के, अनिकेत मानवटकर, पोलीस वाहतूक अधिकारी अनिल यादव, आकाश खोब्रागडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भगव्या पताका, रोषणाई व ढोल-ताशांच्या निनादाने दुमदुमून गेला होता.

  • Save

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती, कन्हान-पिपरी यांच्या वतीने १४ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी १० वाजता व सायंकाळी ७ वाजता विविध संघटनांच्या वतीने मानवंदना दिली जाणार आहे. ढोल-ताशा पथक, दंडार, दानपट्टा, पोवाडे अशा पारंपरिक कलांच्या माध्यमातून शिवचरित्र जनमानसात पोहोचविण्याचा समितीचा संकल्प आहे.

  • Save

यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे नागपूर येथील सुप्रसिद्ध ‘शिवप्रताप’ ढोल-ताशा व ध्वज पथकाची उपस्थिती. २०१० पासून कार्यरत असलेल्या या पथकाने आतापर्यंत सुमारे १७५ ठिकाणी आपले सादरीकरण केले असून महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, बिहार, गुजरात आदी राज्यांतही आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे.

पथकात सुमारे २०० वादक असून त्यामध्ये अभियंते, विद्यार्थी, डॉक्टर, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक तसेच महिला व गृहिणींचा सक्रिय सहभाग असतो. कन्हान येथे आयोजकांच्या आग्रहास्तव तब्बल ९० वादकांचे विशेष पथक सहभागी होत असून, इतक्या मोठ्या संख्येतील वादकांसाठी पोलीस परवानगी प्रक्रियेतही विशेष नियोजन करावे लागले.

  • Save

शिवप्रताप पथकाचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, रामनवमी, गुढीपाडवा आदी प्रमुख उत्सवांमध्ये हे पथक नियमित सहभागी होत असते. पथकाचे बुकिंग चार ते पाच महिने आधीच केले जाते, यावरून त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते.

समितीचे संस्थापक किशोर दादा डिकोंडवार यांनी सांगितले की, शिवजन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून तो स्वाभिमान, संस्कृती आणि प्रेरणेचा सोहळा आहे. शिवप्रताप ढोल-ताशांच्या गजरात कन्हान नगरी दुमदुमणार असून, या भव्य वादनाचा अनुभव घेताना नागरिकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

  • Save

तारसा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू झालेला हा उत्सव संपूर्ण आठवडाभर भक्ती, शौर्य आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देत कन्हानवासीयांना अभिमानाची अनुभूती देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link