कांद्री शहरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना भावपूर्ण अभिवादन; भाजपातर्फे पुण्यतिथी साजरी

कांद्री : भारतीय जनता पार्टी, कांद्री शहर यांच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि महान विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे स्मरण करत कार्यकर्त्यांनी राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला.

  • Save

यावेळी नगराध्यक्ष सुतिजजी पानतावणे, उपाध्यक्ष बंटीजी सरोदे, गटनेते तथा नगरसेवक अतुलजी हजारे, नगरसेवक शिवाजी चकोले, सितारामजी नाटकर, दिनेशजी खाडे, चंद्रपाल कश्यप महाजन, नगरसेविका आरती कोतप्लीवार, अरुणा हजारे तसेच एकनाथ अंबाडकर, उमेशजी वाडिभस्मे, रवी कामडे, विशाल बावणे, प्रदीप आकरे, दिनेश राऊत, उमेश कुंभलकर, लोकेश अंबाडकर, आनंद देशमुख, रोहित पानतावणे, रवी कोतप्लिवार, सुरेंद्र पोटभरे, प्रवीण आकरे, विजय आकरे, सचिन हिंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी ‘एकात्म मानववाद’ या विचारसरणीचा उल्लेख करत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रहित आणि जनकल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे मत व्यक्त करण्यात आले.

  • Save

कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीपर घोषणांनी भारावून गेले होते. शेवटी सर्वांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link