जि.प. उच्च प्राथमिक शाळा–बेलदा येथे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य ज्ञानोत्सव

रामटेक | प्रतिनिधी

“शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान वाटावा” या प्रेरणादायी संकल्पनेतून जि.प. उच्च प्राथमिक शाळा, बेलदा या शाळेने आपल्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ‘स्थापनेचे अमृतमहोत्सवी वर्ष’ मोठ्या उत्साहात साजरे केले.

या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक व भौतिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने लोकसहभागातून शैक्षणिक चळवळ उभी करण्यात आली.
या उपक्रमाचे नेतृत्व मा. सरपंच सौ. स्नेहाताई भांडारकर (गट ग्रामपंचायत–बेलदा) यांनी केले, तर मा. माजी जि.प. सदस्या श्रीमती शांतताई कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून आणि सामाजिक सहकार्यातून शाळेचा भौतिक विकास, मूलभूत सुविधांची पूर्तता, शालेय रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आले. या कार्यात प्रसिद्ध उद्योजक मा. गणेशजी अवथरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. आकाशजी पंधरे, श्री. श्रावणजी बोपटे व श्री. विनोदजी बमनोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

  • Save

संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन

अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत दिनांक ३ फेब्रुवारी २०२६, मंगळवार रोजी
जि.प. प्राथमिक शाळा – गोरेघाट, नवेगाव (खुर्द) व बेलदा येथील शाळा व्यवस्थापन समितींच्या संयुक्त सहकार्यातून वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
• मा. विजयजी भाकरे – गटशिक्षणाधिकारी, पं.स. रामटेक
• श्रीमती शालिनीताई रामटेके – शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. रामटेक
• मा. सुनीलजी कोडापे – गटशिक्षणाधिकारी, पं.स. पारशिवनी
• मा. हिरामणजी कुमरे – माजी शिक्षण विस्तार अधिकारी व सत्कारमूर्ती
• मा. छपाने सर – प्राचार्य, शासकीय आश्रम शाळा, बेलदा
• मा. बोंदरे सर – प्राचार्य, स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवलापार
• गडकरी सर व चंदेल सर
तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

  • Save

विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

या भव्य ज्ञानोत्सवात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे मिळावेत, या उद्देशाने “बाल बचत बँकेची मुहूर्तमेढ” रोवण्यात आली, हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला.

यासोबतच —
• महिला पालकांसाठी हळदीकुंकू समारंभ
• संगीत खुर्ची स्पर्धा
• विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धा
• धावपटूंकरिता २०० मीटर धावण्याची स्पर्धा
• रात्री तिन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम व कलाविष्कार

या सर्व कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

लोकसहभागातून यशस्वी झालेला बालोत्सव

हा बहुआयामी आणि प्रेरणादायी बालोत्सव यशस्वी करण्यासाठी
संयुक्त स्नेहसंमेलन आयोजन व सनियंत्रण समिती – गोरेघाट, नवेगाव (खुर्द) व बेलदा,
तिन्ही गावांतील गावकरी मंडळी, विद्यार्थी, पालक, महिला भगिनी, तरुण-तरुणी यांनी मोलाचे योगदान दिले. शाळा, समाज आणि शिक्षण यांचे नाते अधिक दृढ करणारा हा अमृतमहोत्सवी सोहळा परिसरासाठी प्रेरणादायी ठरला, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link