कन्हान : – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) गटाचे नेते अजितदादा पवार यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. अजितदादा पवार विमानाने मुंबईहून बारामती कडे येत होते. बारा मती जवळ विमान येताच त्यांचा विमानाचा अपघात झाल्याने अपघातात अजितदादा पवार यांचे सह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपुर्ण देशात आणि महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
बुधवार (दि.२८) जानेवारी ला अजितदादा पवार यांचे निधनानंतर त्यांचा स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कन्हान शहर च्या वतीने आंबेडकर चौक येथे महाराष्ट्र प्रदेश उपाध्य क्ष पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांचा अध्यक्षतेत सर्व पक्षीय शोकसभा घेण्यात आली. शोकसभेत राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचा प्रतिमेला पुष्पहार, पुष्पचक्र अर्पण करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण केली. यावेळी नगरपरिषद
कन्हान-पिपरी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, किशोर बेलसरे, विनायक वाघधरे, गणेश पानतावने, शांताराम जळते, अशोक पाटील, वर्धराज पिल्ले, कैप्टन सतिश बेलसरे , राजाभाऊ राऊत यांनी अजित पवार यांचा जीवन कार्यावर प्रकाश टाकित मनोगत व्यक्त करून श्रध्दाजं ली अर्पण केली. उपस्थित सर्व पक्षीय व सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकानी दोन मिनटाचे मौन पाळुन अजितदादा पवार यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनिल लाडेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. मनो हर पाठक, अशोक चव्हाण, राजेश यादव, सुत्तम मस्के , गौतम नितनवरे, ऋषभ बावनकर, श्याम पीपलवा, भूषण निंबाळकर, महेंद्र साबरे, राजेंद्र हटवार, स्वप्निल वाघधरे, रवी महाकाळकर, आकाश वाढनकर, हरिश खंगारे, संदीप कभे, सम्राट पगारे, रोहित मानवटकर, मनोहर मेश्राम, अभिजीत चांदुरकर, नारायण गजभिये , महेंद्र चव्हाण, पुरंदास तांडेकर, श्रीराम नांदुरकर,शरद वाटकर, संजय शेंदरे, आशिष दिवटे, शैलेश शेळके, गजु गोरले, शूभम बावनकर, शैलेश दिवे, मयूर माटे, रंगलाल येलेकर, प्रशांत पाटील, शशिकला बागडे, पुष्पा कावडकर, शुभांगी घोगले, कुसुम सत्येकार, स्वाती पाठक, संगिता खोब्रागडे, लक्ष्मी लाडेकर, वर्षा लोंढे, मनिषा चिखले, सुचित्रा माटे, पुनम राठी, योगिता भलावी सह मोठ्या संख्येने सर्व पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

