सार्थ पब्लिक स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम व प्रजासत्ताक दिन थाटात संपन्न

कन्हान : – येथिल सार्थ पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वतंत्र भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला.

  • Save


शनिवार (दि.२४) जानेवारी ला सार्थ पब्लिक स्कूल कन्हान या इग्रजी माध्यमाच्या शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम समाज सेवक मा. नागोरावजी साबरे यांचे अध्यक्षेत तर रामटेक क्षेत्राचे खासदार मा श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन नगराध्यक्ष कन्हान मा. राजेंद्र शेंदरे, नगराराध्यक्ष कांद्री मा सूजित पानतावणे, शाळेचे संचालक भूषणराव निंबाळकर, नगरसेवक प्रशांत पाटील, नगरसेविका सूषमा चोपकर, यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के बी निंबाळकर, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका दिपाली गी-हे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Save

या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी , के जी वन ते ८ वी च्या विद्यार्थ्या नी सुंदर नुत्य, सामुहिक नुत्य, गायन, समुहगीत, नाटय प्रयोग तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवा णी सादर करून उपस्थित दर्शकाना मंत्रमुग्ध केले.

  • Save


सोमवार (दि.२६) जानेवारी ला सकाळी ९ वाजता शाळेच्या पटागंणात प्रजासत्ताक दिनी शाळेच संचालक मा भूषणराव निंबाळकर यांचे अध्यक्षेत लॉयन्स क्लब कन्हान कोल सिटी चे माजी अध्यक्ष मा भगवान नितनवरे यांचे हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगि ताने सलामी देण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन लॉयन्स क्लब कन्हान कोल सिटी चे माजी अध्यक्ष रंगराव पोटभरे, मा डॉ श्रीकृष्ण जामोदकर आदीच्या प्रमुख उपस्थित स्वतंत्र भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला.

  • Save

दोन्ही कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सार्थ पब्लिक स्कूल कन्हान च्या प्रभारी मुख्याध्यापिका दिपाली गी-हे, परिसर प्रभारी कु. सना अन्सारी, शिक्षिका दर्शना गायकवाड, चंदा कुसुंबे, मंगला बावणे, नेहा नायडु, दिपाली ठवकर, प्रतिमा चौधरी, कोमल लुहुरे, निशांत लोखंडे, व्ही के साखरकर आदी सह शिक्षक-शिक्षके तर कर्मचारी वृंद पालक आणि विद्यार्थ्यानी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link