संत तुकाराम बीज निमित्य तुकाराम महाराजांना कार्यक्रमासह अभिवादन

कन्हान :- संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमांतर्गत साई पालखी पदयात्रेते भव्य स्वागत व प्रस्थान, जगतगुरू संत तुकाराम महाराज मंदीर समिती कन्हान व्दारे संत तुकाराम महाराज मंदीर संत तुकाराम महाराज नगर कन्हान येथे पुजा, अर्चना, भजन व दहीकाला आणि कन्हान ते शिर्डी साईराम पालखी पदयात्रेचे भव्य स्वागत करून संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.

  • Save

गुरूवार (दि.५) मार्च २०२६ ला जगतगुरू संत तुकाराम महाराज मंदीर समिती व्दारे संत तुका राम महाराज मंदीर संत तुकाराम मंदीर, संत तुकाराम महाराज नगर कन्हान येथे सकाळी १० वाजता पुजा अर्चना करून ताराचंद निंबाळकर व विठ्ठल मानकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून संत तुकाराम बीज कार्यक्र माची श्री संत गजानन महाराज भजन मंडळ कन्हान चे भगवान लांजेवार, रमेश गणोरकर, गजानन वडे, हरिनाथ लेन्डे, देवराव गोतमारे, श्रावण लांजेवार, पुरू षोत्तम कुंभलकर, हीरालाल लुहुरे, गुलाबराव ढोबळे यांच्या भजन गायनाने सुरूवात करण्यात आली.

  • Save

दुपा री १२.३० वाजता नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, वसंतराव इंगोले, गुंडेराव ठाकरे, अरविंद कडुकर यांच्या हस्ते पुजन व दहीहंडी फोडुन आरती करून सर्व उपस्थितां ना दहीकाल्याचा प्रसाद वितरण करित असतानाच कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रेचे आगमण होताच सर्व भाविक मंडळीने साईराम पालखीचे भव्य स्वागत करित पालखी पदयात्रेच्या दर्शनाचा लाभ घेत यात्रे करूना दहीकाला, बुंदीचा प्रसाद वाटप करून मराठा सेवा संघ कन्हान व्दारे साई पालखी पदयात्रा प्रमुख मनोज चिकटे, अविनाश रायपुरे हयाना रूपयाचे पॉकिट देऊन यात्रेस आर्थिक मदत करण्यात आली.

  • Save

“संत तुकाराम महाराज की जय”, साईराम की जय च्या जयघोषात साई पालखी पदयात्रा तारसा रोड ने जल्लोषात पुढे मार्गक्रमण करण्यात आली. सर्व उपस्थितांनी संत तुकाराम महाराजांना तिवार वंदन करून संत तुकाराम बीज कार्यक्रम साजरा करण्यात आला.

  • Save

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ताराचंद निंबाळ कर, विठ्ठल मानकर, मोतीराम रहाटे, प्रशांत भोयर, शांताराम जळते, स्वप्निल मते, योगराज अवसरे, सुधिर घोडकी, नितीन ईखार, भगवान कडु, नामदेव नवघरे, राकेश घोडमारे, एकनाथ खर्चे, नगरसेवक प्रशांत पाटील, गोविंद जुनघरे, शरद वाटकर, अशोक ठाकरे, सुरेश चकोले, मनोहर लुहुरे, मारोती ठवकर, रंजनी निंबाळकर, सुनिता मानकर, सुनंदा कोठे, दीपाली घोडकी, चंदा लुहुरे, माला नवघरे, प्रमिला मते, पुष्पा खर्चे, सुषमा चोपकर, रामेश्वरी पटले, मिना मनगटे, लता मेहर, रेवतकर ताई, शकुंतला डोणारकर, निशा फरसोले, गडे बाई, ठवकर बाई, गीता नेवारे, कुंदा चौबे, चन्ने बाई, शशिकला सोनबावणे, अनिता पटले, सुनंदा कडुकर सह सर्व संत तुकाराम नगर आणि कन्हान शहरवासी यांनी सहकार्य केले.

  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link