जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था, कन्हान आणि कन्हान नवरात्र गरचा महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सांस्कृतिक मंडई महोत्सव–२०२५ चे आयोजन मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजक वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कानपूर केमिकल मैदानावर सलग तीन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक सोहळ्याने कन्हान शहरात उत्साह, संस्कृती आणि लोककलांचा अद्भुत संगम घडवून आणला.
मंत्री ॲड. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आयोजक वर्धराज पिल्ले यांच्या नियोजनामुळे हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा उत्सव ठरला. जयस्वाल यांच्या विकासदृष्टीतून प्रेरित होऊन पिल्ले यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला.
पहिला दिवस : उद्घाटन व जुई शेरकर यांची लावणी ठरली आकर्षणाचे केंद्र
दि.१ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व आयोजक वर्धराज पिल्ले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर बावनकर, हर्षवर्धन निकोसे, कृष्णकुमार अग्रवाल, दामोधर बंड, पी.डी. जयस्वाल, तसेच कन्हान पोलिस ठाण्याच्या निरीक्षक वैजयंती मांडवधरे उपस्थित होते.
उद्घाटनानंतर ‘बैलगडा’ फेम लावणी सम्राज्ञी जुई शेरकर यांच्या थरारक सादरीकरणाने मैदान दुमदुमून गेले. प्रेक्षकांनी पावसात भिजतही ‘वन्स मोअर’च्या आरोळ्यांनी वातावरण भारावून टाकले. उद्घोषकाच्या “पिल्ले हाच एक राजा” या घोषणेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दुसरा दिवस : महसूल मंत्री ॲड. जयस्वाल यांच्या उपस्थितीत ‘आम्रपाली लावणी ग्रुप’चा जल्लोष
दि.२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पुण्यातील प्रसिद्ध ‘आम्रपाली लावणी ग्रुप’ च्या कलाकारांनी नेत्रदीपक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी जयस्वाल म्हणाले, “लोककला ही आपल्या संस्कृतीचा पाया आहे. समाजात आनंद, एकता आणि परंपरेची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे. वर्धराज पिल्ले यांच्यासारखे उत्साही आयोजक लोककलाकारांना योग्य व्यासपीठ देतात, हे कौतुकास्पद आहे.”जयस्वाल यांच्या या शब्दांवर नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कार्यक्रमात कृष्णकुमार अग्रवाल, पी.डी. जयस्वाल, दामोधर बंड, प्रभाकर बावणे, महावीर खंगारे, नेवालाल सहारे, शिवसेना शहरप्रमुख गजानन गोरले, महिला आघाडी अध्यक्षा मनिषा चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.
तिसरा दिवस : लोककला, रोषणाई आणि जनतेचा आनंदोत्सव
मंडईच्या अखेरच्या दिवशी आकर्षक रोषणाई, बालकांसाठी खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि लोककलेचे सादरीकरण यांनी वातावरण उत्सवमय झाले. विविध गावांतील लोककलाकार आणि व्यापाऱ्यांनी आपल्या कलादर्शनातून लोकांची मने जिंकली. भाऊबीजसाठी आलेल्या महिलांनी मंडईचा आनंद घेत आयोजकांचे कौतुक केले.
आयोजकांचा पुढाकार आणि नागरिकांची प्रशंसा
या महोत्सवाच्या यशामागे आयोजक वर्धराज पिल्ले यांची दूरदृष्टी, नियोजनशक्ती आणि जनतेशी असलेले आत्मीय संबंध दिसून आले. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून कन्हान परिसरात सामाजिक, सांस्कृतिक आणि जनकल्याणाच्या माध्यमातून प्रभावी कार्य केले आहे.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी मंडई अध्यक्ष छोटू राणे, उपाध्यक्ष शरद वाटकर, सचिव अजय चव्हाण, सहसचिव आकाश भगत, कोषाध्यक्ष प्रदीप गायकवाड, तसेच गजानन गोरले, दीपचंद शेंडे, प्रशांत स्वामी, अभिलाष पिल्ले, वैशाली श्रीखंडे, दिशा पाटील, स्नेहल राणे, रंजिता सूर्यवंशी, पपिता टेकाम आणि अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
महसूल मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयोजक वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सांस्कृतिक मंडई महोत्सवाने कन्हान शहरात लोककला आणि समाजभावनेचा एक सुंदर संगम साधला. नागरिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जयस्वाल आणि पिल्ले यांचे मनापासून अभिनंदन केले.

