पारशिवनीत महिला शेतकरी उत्पादक कंपनीची तृतीय वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न

पारशिवनी सहेली महिला शेतकरी उत्पादक कंपनी प्रा. लि., दहेगाव जोशी यांची तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा तकीया मारुती देवस्थान सभागृह, पारशिवनी येथे उत्साहात संपन्न झाली. या सभेला मोठ्या संख्येने महिला सभासद, संचालिका व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सुभाष जाधव , गटविकास अधिकारी, पंचायत समिती पारशिवनी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी पंचायत समिती सभापती सौ. मंगला निंबोणे उपस्थित होत्या. तसेच युवा शेतकरी श्री. राहुल कमलाकर जी. मेंघर, तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष (पंचायत समिती पारशिवनी) चे बी.एम.एम. श्री. रोशन लकडकर सर,तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष कळमेश्वरचे श्री. संदेश लामसोंगे सर, सी.सी. युवराज पोटोडे, प्रायमूचे श्री. स्वप्निल बांगरे सर, नागपूर जिल्ह्याचे श्री. अमोल चौधरी तसेच डोईफोडे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.

  • Save

कंपनीच्या अध्यक्षा सौ. हर्षा सतीश धांडे, सचिव वर्षा वासुदेव खंडाते, कोषाध्यक्ष सौ. माधुरी संदीप वासाडे, संचालिका सौ. शिल्पा नंदकिशोर चौधरी, श्रीमती वैशाली ठाकरे, तसेच प्रवर्तक (प्रमोटर) लीलाबाई बोरकर, तारा बागडे, कल्पना शेंडे, कविता भिहुणे, पूजा सूर्यवंशी व सर्व संचालिका, प्रवर्तक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीच्या वार्षिक कामकाजाचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. यामध्ये बांधकाम व यंत्रसामग्री खरेदी, मागील सभेनंतर झालेला खर्च, तसेच प्रस्तावित नवीन खर्चास सभासदांची मंजुरी घेण्यात आली. वेळेत प्राप्त झालेल्या विषयांवर सखोल चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात आले.

तसेच कंपनीच्या पुढील कार्ययोजना, भविष्यातील उपक्रम व महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपस्थित सदस्यांना देण्यात आली. सभेच्या यशस्वी आयोजनामुळे महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link