आरोग्य रोगनिदान शिबीरात ११० नागरिकांची तपासणी, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सेवाभावी उपक्रम

कन्हान,ता.१९ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कन्हान शहर विकास मंच व सुपर केअर हॉस्पीटल, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान मंदिर, खदान रोड, गांधी चौक कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  • Save

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी मंचचे मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिए, पोलीस पाटील कांचन मस्के, माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके आदी उपस्थित होते.

  • Save

शिबिरात सुपर केअर हॉस्पिटलचे डॉ. वलीउर शाहीर रहमान, डॉ. अख्तर खान, डॉ. अदित हवेलीकर, डॉ. ऋषीकेश मालीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ११० नागरिकांची तपासणी करण्यात आली. दंत व मुखरोग, जनरल सर्जन तपासणी, ० ते १२ वर्षे वयोगटातील बालरोग तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच मोतीबिंदू व पडदा तपासणी आदी सेवा मोफत देण्यात आल्या. उपस्थितांना “आपले आरोग्य कसे व्यवस्थित राखावे” याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.

  • Save

हनुमान मंदिर, खदान रोड पंचकमिटीचे शिबिरास विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिए, वामन देशमुख, प्रमोद गिऱ्हे, निखिल तांडेकर, यश शेंडे, मृणाल सरोजकर, शुभम बावनकर, सुर्यभान चकोले, अविनाश कांबळे, निलकंठ मस्के, अर्चना तांडेकर, मीना गिऱ्हे, ममता मेश्राम, जयश्री गटपाडे, सुषमा मस्के, रंजना किरपाने, विभा पोटभरे, सुरज वरखडे, अर्जुन पात्रे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, अभय ऊके, रुजल मेश्राम, रुपेश मेश्राम, मयूर बावणे आदींनी परिश्रम घेतले.

  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link