वेकोली खाणीतून कोळसा चोरी – २४ आरोपी जेरबंद !

वेकोली खाण परिसरात बराच काळ सुरू असलेल्या दगडी कोळसा चोरीच्या रॅकेटवर अखेर कन्हान पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांच्या या सापळ्यात तब्बल २४ आरोपी जेरबंद झाले असून, १४ दुचाकी व १० सायकलींसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे


सोमवार (दि.१०) नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास, पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली.
दरम्यान, वेकोली खाण क्षेत्रातून कोळशाच्या बोर्‍या वाहतूक करणारे काही संशयित दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली असता, मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा साठा आढळून आला.

  • Save


या कारवाईत धनपत सैदल कश्यप, बडका चौकीदार कश्यप, चुन्नूराम कश्यप, संतराम कश्यप, रामबाबू कश्यप, बच्छराज कश्यप, मनोज कश्यप, छोटेलाल कश्यप, आकाश जगणे, अशोक शेंद्रे, धनराज गजभिये, अभिषेक भोयर, शाहनवाज खान, प्रभात सोनवणे, नितेश सहारे आदींसह एकूण २४ जणांना ताब्यात घेण्यात आले.

  • Save


घटनास्थळी पंचनामा करून, दुचाकी, सायकली व कोळशासह एकूण २,०३,६५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण ९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास कन्हान पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link