आज गुरुवार (दि. ०८ जानेवारी २०२६) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे नगरपंचायत कांद्री येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक–नगरसेविकांच्या बहुमताने ‘कांद्री (कन्हान) नगरविकास आघाडी’ या नव्या राजकीय गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी श्री. विपिनजी इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही गटस्थापना पार पडली.
यावेळी बहुमताने मा. श्री. अतुल रमेशजी हजारे यांची नवगठित आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. तसेच मा. श्री. शिवशंकरजी (शिवा) रामभाऊजी चकोले यांची उपनेतेपदी, तर बंटी सरोदे यांची पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री. सुजितजी डोमाजी पानतावणे यांच्यासह नगरसेवक मा. श्री. चंद्रपालजी कश्यप, मा. श्री. उमेशजी वाडीभस्मे, मा. श्री. सितारामजी नाटकर, मा. श्री. राकेशजी लांजेवार उपस्थित होते. तसेच नगरसेविका सौ. मिनाक्षी भुते, सौ. सविता राऊत, सौ. माधुरी मस्के, सौ. आरती कोतपल्लीवार, सौ. रिता मस्के, सौ. संघमित्रा डोंगरे, सौ. रोशनी गजभिये यांनी बहुमताने सहभाग नोंदविला. याशिवाय मा. श्री. नरहरीजी पोटभरे, मा. श्री. रवींद्रजी कोतपल्लीवार, मा. श्री. अतुलजी गजभिये हेही उपस्थित होते.
कांद्री नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि गतिमान कारभार करण्याचा संकल्प नवगठित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या गटस्थापनेमुळे कांद्री नगरपंचायतीच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून येत्या काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

