एमडी पावडर मादक पदार्थाची विक्री करताना तरुणास अटक

कामठी- जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आऊटर रिंग रोड पुलाखाली खैरी शिवारात एमडी पावडर मादक पदार्थ वावरताना तरुणास अटक करून तीन लाख 47 हजार 750 रुपयाचा मध्यमाल जप्त केल्याची कारवाई जुना कामठी पोलिसांनी केली असून नवनीत सुरेश सेवाने वय 28 वर्ष राहणार आराधना नगर बिडगाव तालुका कामठी असे आहेत.

  • Save

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नवनीत सुरेश शेवाने वय 28 वर्ष राहणार आराधना नगर बीडगाव याने फरार आरोपी गोलू नावाच्या तरुणांकडून 55 ग्राम एमडी पावडर मादक पदार्थ विकत घेऊन नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर खैरी शिवारातून जात असताना जुनी कामठी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून आरोपी नवनीत सुरेश शेवाने यास थांबवून चौकशी केले असता त्याचे जवळ दोन प्लॅस्टिकच्या पिशवीत 55 ग्राम एमडी पावडर मिळून आला त्याचे जवडून ५५ ग्राम MD पावडर किंमत 2 लाख 65 हजार ,रुपये हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एमएच 40 सीजी 8554, वजन काटा ,मोबाईल फोन एकूण 3 लाख 47 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. जुनी कामठी पोलीस स्टेशनला आरोपी नवनीत सुरेश शेवाने व ज्यांचे कडून मादक पदार्थ विकत घेतले गोलू नावाच्या तरुणा विरोधात कलम 8 (क ),22 (क ),29 एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली दुसरा फरार आरोपी गोलू चा पोलीस शोध घेत असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link