कन्हान छत्रपती शिवराय जयंती निमित्य मराठा सेवा संघ कन्हान व्दारे जगतगुरू संत तुकाराम महा राज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत शिवराय जयंती साजरी केली.
गुरूवार (दि. १९) फेब्रुवारी २०२६ ला महाराष्ट्रा चे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती ला मराठा सेवा संघ कन्हान व्दारे सर्व प्रथम संत तुकाराम नगर येथिल मंदीरात संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमे ला पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सवाची सुरूवात करण्यात आली.
तदंतर शिवाजी नगर कन्हान येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळयास मराठा सेवा संघ कन्हान चे मार्गदर्शक प्रभाकर महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून “जय जिजाऊ !! जय शिवराय !! , छत्रपती शिवरायांचा विजय असो” च्या जय घोष करित उपस्थितानी महाराजांना मानवंदन दिले.
याप्रसंगी मराठा सेवा संघ कन्हान चे प्रभाकर महाजन, शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर, एकनाथ खर्चे, मोतीराम रहाटे, स्वप्निल मते, देवराव गोतमारे, राकेश घोडमारे, विठ्ठल मानकर, नामदेव नवघरे, ओमप्रकाश काकडे, मनिष वासे, दिगांबर हारगुडे सह शिव प्रेमी प्रामुख्याने उपस्थित राहून शिवराय जयंती थाटात साजरी केली.

