कोराडी येथे ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत ५२ लाभार्थ्यांना पट्टेवाटप

जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे प्रभावी नेतृत्व म्हणून मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ओळख

कोराडी, नागपूर :
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील परसाड व तरोडी गावातील एकूण ५२ लाभार्थ्यांना घरांचे अधिकृत पट्टे मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात वाटप करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “घर ही केवळ भिंतींची रचना नसून ती कुटुंबाच्या सुरक्षिततेची, सन्मानाची आणि भविष्याच्या स्थैर्याची पायाभरणी आहे. शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हीच माझी प्राथमिकता आहे.”

  • Save

जनतेच्या अडचणींवर थेट उपाय करणारे, सामान्य नागरिकांशी सातत्याने संवाद साधणारे नेतृत्व म्हणून मा. बावनकुळे यांची ओळख आहे. महसूल मंत्री म्हणून त्यांनी जमिनीचे प्रश्न, पट्टेवाटप, पुनर्वसन, शेतकरी व गरजू घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील एक प्रभावशाली व विश्वासार्ह नेता म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे.

या कार्यक्रमास भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान, जिल्हा मंत्री रमेश चिकटे, परसाड ग्रामपंचायतचे सरपंच मनोज कुथे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, पंचायत समिती गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले, नायब तहसीलदार मयूर चौधरी यांच्यासह विक्की गावंडे, रवींद्र माटे, जितू डाफ, गेदलाला अटारकर, यशवंता मानमोडे तसेच असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Save

या पट्टेवाटपामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार झाले असून, त्यांच्या जीवनात सुरक्षितता व स्थैर्य निर्माण झाले आहे. मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लोकाभिमुख, पारदर्शक व विकासाभिमुख प्रशासनाचा विश्वास अधिक दृढ होत आहे, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link