कन्हान | ता. 30
नाभिक एकता मंच, खंडाळा (घटाटे) यांच्या वतीने खंडाळा गावातील चौकाला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांच्या नावाचा फलक थाटात अनावरण करण्यात आला. हा सोहळा सोमवार, दि. 30 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत खंडाळा (घटाटे) अंतर्गत गावातील चौकात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच विमलताई बोरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच रविंद्र केने होते. यावेळी उपसरपंच चेतन कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्य वर्षा नागपुरे, मनिषा हटवार, नाभिक एकता मंचचे अध्यक्ष धनराज वालुकार, केंद्रीय दुकानदार संघाचे अध्यक्ष नरेश लक्षणे, विदर्भ अध्यक्ष शरद वाटकर, जिल्हाध्यक्ष विलास वाटकर, नागपूर ग्रामीण जिल्हा सचिव राहुल गणोरकर, पारशिवनी तालुकाध्यक्ष सुनिल लक्षणे, तसेच सुनिल लाडेकर, किशोर गाडगे, प्रमोद केजरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारे शूर आणि निष्ठावान अंगरक्षक म्हणून न्हावी समाजातील शिवरत्न जिवाजी महाले यांच्या पराक्रमावर प्रकाश टाकला. ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या उक्तीचा उल्लेख करत त्यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली.
खंडाळा गावातील चौकाला शिवरत्न जिवाजी महाले यांचे नाव देण्यात आल्याबद्दल ग्रामपंचायत खंडाळा (घ.)चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिव व पोलीस पाटील यांचे नाभिक एकता मंचच्या वतीने आभार मानण्यात आले.
कार्यक्रमास प्रदीप वानखेडे, सुहास पुंडे, रवि वानखेडे, गजानन लक्षणे, बंडु लक्षणे, राजेंद्र लक्षणे, दिनकर लक्षणे, नंदलाल लक्षणे, पवन लक्षणे, श्याम केजरकर, चंद्रकांत लक्षणे, माला राजुरकर, बबिताताई लक्षणे, संगीतताई चौधरी, छबुबाई नांदुरकर, शोबाताई येसकर, वंदनाताई लक्षणे, पुनम शेंडे यांच्यासह नाभिक एकता मंच खंडाळा (घटाटे), न्हावी समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

