शिवसेनेच्या करुणा आष्टणकर यांचा जनविश्वासाचा प्रवास!

कन्हान, (सुनील सरोदे)
सेवा, संघर्ष आणि समर्पणाच्या वाटेवर चालत 28 वर्षांचा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर वाहणाऱ्या सौ.करूणा आष्टणकर यांनी आज आपल्या कार्याने जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. एकेकाळी सामान्य कार्यकर्ती म्हणून समाजकार्याची सुरुवात करणाऱ्या या नेत्या आज शिवसेनेच्या प्रमुख महिला चेहऱ्यांपैकी एक आहेत.

1998 साली समाजसेवेच्या माध्यमातून गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी लढा देताना त्यांच्या कार्याची दखल स्थानिक लोकांनीच नव्हे तर पक्ष श्रेष्ठींनीही घेतली. याच कार्याचा सन्मान म्हणून 1999 साली शिवसेना पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांच्या कार्याची झेप अशी वाढत गेली की, महिला शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, आणि अखेर उमरेड–कामठी–रामटेक विधानसभा महिला जिल्हाप्रमुख या जबाबदाऱ्यां पर्यंत त्यांनी प्रवास केला.

  • Save


याच काळात त्यांनी तेली समाजातही आपले स्थान निर्माण केले — तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्य केल्यानंतर सध्या नागपूर ग्रामीण तेली समाजाच्या सचिवपदी आहेत. समाजातील ऐक्य, शिक्षण व संस्कृती जपण्यासाठी त्यांचे योगदान विशेष मानले जाते.
राजकारणात पदार्पण करताना त्यांनी प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवली आणि तेथूनच त्यांच्या कार्यक्षमतेचा प्रवास सुरू झाला. 2012 मध्ये पंचायत समिती सदस्य व सभापती म्हणून कार्य करत तीन सर्कलमध्ये विकासाची गंगा वाहिली. 2015 मध्ये नगरसेविका म्हणून विजयी झाल्यानंतर शहरातील विकासाचा आराखडा बदलला. त्यानंतर 2020 मध्ये महिला राखीव नगराध्यक्षपद शिवसेनेच्या तिकिटावर जिंकत त्यांनी इतिहास घडवला.


नगरसेवक असताना त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी 17 दिवसांचे उपोषण केले आणि नागरिकांच्या जीवाशी निगडीत प्रश्नावर प्रशासनाला झुकवले. पिपरी ते गाडेघाट रस्ता डांबरीकरणासाठी 28 दिवस आंदोलन करत आपल्या मागण्या मान्य करवून घेतल्या — हेच त्यांचं जिद्दी नेतृत्व दर्शवते.
नगराध्यक्ष झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी अनेक अडथळे पार केले. गहू–हिवरा रोडवरील अवैध वाहतूक बंद करण्यासाठी केलेल्या ठोस निर्णयामुळे न्यायालयीन लढाई लढावी लागली, पण त्यांनी सत्याच्या बाजूने उभे राहून न्याय मिळवला.

  • Save


कोरोनाकाळात जनतेसाठी जीव ओवाळून टाकला

2020 मध्ये कोरोनाचा काळ सुरू झाला. सर्वत्र भीती, बंदी आणि निराशा होती.
पण त्या काळात करुणाष्टक बाई रस्त्यावर होत्या — हातात सॅनिटायझर, चेहऱ्यावर मास्क, आणि मनात जनतेसाठीची ओढ. भुकेल्यांना अन्न, आजाऱ्यांना औषधं, आणि एकाकी वृद्धांना आधार देत त्यांनी हजारो लोकांचा जीव वाचवला.
कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले कार्य आजही लोक विसरू शकत नाहीत. जीवावर उदार होऊन नागरिकांना अन्न, पाणी, औषध पुरवठा केला, रुग्णांना स्वतः हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रभागात प्रभाग फिरून नागरिकांच्या तब्येतीची चौकशी केली, आरोग्य सेवा पोहोचवली. अशा संकट काळात त्या जनतेसाठी “आशेचा किरण” बनल्या.
2020 ते 2025 दरम्यान शासनाकडून निधी कमी मिळूनही त्यांनी हार मानली नाही. पत्रव्यवहार, निवेदनं, आणि सातत्याने प्रयत्न करून अनेक शासकीय कामांना गती दिली. विरोधकांनी राजकीय अडथळे आणले तरी जनतेच्या हिताचा ठाम आवाज उठवला.

  • Save


शहरातील काही भागांमध्ये खासगी कंपनीच्या हस्तक्षेपामुळे कामे अडली असली तरी सौ.करुणा आष्टणकर नेहमी लोकांना खरी परिस्थिती सांगितली. विरोधकांनी अफवा पसरवल्या, पण लोकांचा त्यांच्यावरील विश्वास ढळला नाही.
आज त्या पुन्हा एकदा जनतेसमोर निर्धाराने म्हणतात —
लोकांशी जोडलेलं नातं
त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं जनसंपर्क.
प्रत्येक सणाला, दु:खद प्रसंगी, कार्यक्रमात, समाजकार्यात त्या स्वतः उपस्थित राहतात.
कधी राखी बांधणारी बहीण म्हणून, कधी संकटात आधार देणारी आई म्हणून — त्या जनतेत वावरतात.
कन्हानच्या रस्त्यांवर फिरताना आजही लोक म्हणतात —
अगं, आपली बाई आली रे!
ही ओळख म्हणजे त्यांच्या कार्याचं खरं बक्षीस आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link