शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नगरपरिषद निवडणुकीसंदर्भातील आढावा व रणनिती बैठक विवेकानंद नगर, कन्हान येथे उत्साहात पार पडली. रविवार (दि. १ नोव्हेंबर २०२५) रोजी सायंकाळी ७ वाजता सचिन साळवी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिवसेना माजी खासदार मा. प्रकाशभाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हा प्रमुख (ग्रामीण) पुरुषोत्तम मस्के, उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर, शहर प्रमुख विजेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत कन्हान-पिपरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती, प्रभागनिहाय संघटन बांधणी व विकास आराखड्यांवर चर्चा करण्यात आली. नगरपरिषदेला दहा वर्ष पूर्ण होऊनही शहर विकासात झालेल्या पिछाडीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रभाग क्रमांक १ ते १० मधील कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागातील प्रश्न, विकास कामे आणि संभाव्य उमेदवारांविषयी मतप्रदर्शन केले. प्रत्येक प्रभागातून दोन ते तीन इच्छुकांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली.
जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम मस्के व उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “१९८८ पासून कन्हान शाखेतून शिवसेनेची ठोस पायाभरणी झाली असून, जनसेवा हाच पक्षाचा आधार आहे.”
माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव म्हणाले, “कन्हान शहराने शिवसेनेला कायम पाठिंबा दिला आहे. आजही शिवसेना (उबाठा) पक्षच शहराच्या विकासाचे खरे शिल्पकार ठरू शकतात. आगामी निवडणुकीत शिवसेना पक्ष बहुमताने नगरपरिषदेत सत्ता स्थापन करून शहराला पुनश्च वैभव प्राप्त करून देईल.”
या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी मधुकर नागपुरे, मोतीराम रहाटे, सचिन साळवी, रूपेश सातपुते, देवा चतुर, प्रदीप वानखेडे, गोविंद जुनघरे, पुरुषोत्तम येणेकर, सुधाकर जुनघरे, नेवालाल पात्रे, जिवन ठवकर, हबीब शेख, राजेश गणोरकर, विशु गुप्ता, यशवंत खंगारे, आशिष पात्रे, आनंद पाटील, अमर किरपाने, सतिश झलके, प्रदीप बावने, संदीप शेंडे, दामोदर बोकडे, राकेश चौधरी यांच्यासह महिला पदाधिकारी शिला सहगल, वर्षा पात्रे, दीपिका घोडकी, सोनू सहगल, सुनिता पात्रे यांनी योगदान दिले.बैठकीस मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

