महाशिवरात्रीनिमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

कन्हान, ता. १६ : भगवान शिव व माता पार्वती यांच्या पावन विवाहोत्सवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्री निमित्त कन्हान शहर व परिसर पूर्णतः शिवमय झाला. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक, रुद्राभिषेक, आरती व भजन-कीर्तनांचे स्वर घुमू लागले होते. रविवारची सुटी असल्याने दिवसभर भाविकांची अलोट गर्दी उसळली. दर्शनासाठी मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

  • Save

तिवाडे लेआउट, पाधन रोड येथील गजानन मंदिर येथे शिव-पार्वती विवाहोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पहिल्या दिवशी शिव-पार्वतींना हळद लावून पारंपरिक हळदीचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी भजन, कीर्तन, आरती, रुद्राभिषेक यानंतर ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

  • Save

गजानन मंदिरातून निघालेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून भ्रमण करत गणेश मंदिरात दाखल झाली. आकर्षक झांकी, कलश, विविध वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. सायंकाळी जस गायनाच्या कार्यक्रमाने भक्तिरसाची मैफल रंगली. महिलांनी शिवभक्तीपर गीतांवर नृत्य करत वातावरण अधिकच भारावून टाकले.

  • Save

जुना पोलीस स्टेशन, गांधी चौक येथील पुरातन मंदिरात महादेवाच्या पिंडीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे अभिषेकानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी दूध, दही, मध, बेलपत्र अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली.

  • Save

काली मंदिरातही सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कन्हान-पिंपरी शिवमंदिरात लघुरुद्र, अभिषेक व आरतीनंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्फूर्ती चौकातील शिवमंदिरात दिवसभर फराळाचे वाटप करण्यात आले.

  • Save

शिवनगर येथील महादेव मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसरात पूजासाहित्याचे स्टॉल्स सजले होते. बेलपत्र, रुईची पांढरी फुले व इतर पूजासाहित्याची खरेदी करत भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

  • Save

तिवारी लेआउट येथील गजानन महाराज मंदिरातही महिलांनी पुढाकार घेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. नीतू ऑडियर, राणी नागपूरे, प्रांजली नागपुरे, अंजू जाधव, कांचन महिंद्रकर, सुनंदा वानखेडे, ज्योती फाये, चंदा संकला, पूनम गुरफडे, दीक्षा ठाकरे, स्वाती महाले, प्रीती राठी, अपर्णा मिश्रा, किर्ती नांदुरकर, दर्शना तिडके, प्राची वंजारी तसेच समस्त शिव परिवाराच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

  • Save

एकूणच, अभिषेक, भजन, कीर्तन, शोभायात्रा आणि फराळ वाटपाच्या माध्यमातून कन्हान शहरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली. “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि शहर खऱ्या अर्थाने शिवमय झाले.

  • Save
  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link