मतिमंद शाळेत सामाजिक उपक्रमातून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

कन्हान, ता. १९ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सनातनी धार्मिक संस्था, कन्हान क्षेत्राच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने राजीव कर्णबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

  • Save

कार्यक्रमाची सुरुवात मार्गदर्शक भरत सावळे व शिक्षक कैलास आचरकटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे व वेदांत बावनकुळे यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

संस्थेच्या सदस्यांकडून विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हसू हा समाजकार्याचा खरा यशाचा क्षण ठरला. यावेळी शाळेला श्री शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले.

  • Save

कार्यक्रमास शिक्षिका करिष्मा शास्त्री, शिक्षक सुदर्शन शेंडे, हिमांशू सावरकर, निखिलेश चकोले, जीवन नांदुरकर, वेदांत बावनकुळे, प्रथमेश कोल्हे, आयुष संतापे, यश महालगाव, सिद्धार्थ पुंडे, क्रिश, हर्ष सूर्यवंशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link