कन्हान शहर विकास मंचतर्फे पत्रकार व युवा दिन उत्साहात

कन्हान शहर विकास मंचतर्फे देशाच्या प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन व युवा दिन कार्यक्रम गांधी चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एन. एस. मालवीय होते. मंच मार्गदर्शक भरत सावळे, ज्येष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी, कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम राहाटे, शांताराम जळते, रामेश्वर शेंडे आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांचा डायरी, पेन, दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करताना पत्रकार दिन व युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • Save


कार्यक्रमाची प्रस्तावना मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी मांडली. सूत्रसंचालन अर्जुन पात्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप बावने यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार बांधव, युवक-युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिए, प्रदीप बावने, अर्जुन पात्रे, नाना ऊकेकर, रुपेश मेश्राम, मृणाल सरोजकर, यश शेंडे, नयन गायकवाड यांच्यासह महिला सदस्य अर्चना तांडेकर, मीना गिऱ्हे, सुषमा मस्के, ममता आष्टणकर, जयश्री गडपाडे, मीना कळंबे तसेच वेदांत कांमडे, प्रमोद गिऱ्हे, शुभम बावनकर, आयुष संतापे, हिमांशु सावरकर, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, रविंद्र कोच्चे, आकाश वांढणकर, माहेर इंचुलकर, अभय ऊके, रुजल मेश्राम, सुरज वरखडे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link