कन्हान नगरपरिषदेत आज (दि. २९) विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्व पदांसाठी एकमताने अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्री. दीपक घोडके यांनी कामकाज पाहिले, तर नगरपरिषद अध्यक्ष श्री. राजेंद्र शेंदरे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. गटनेते मनोज कुरडकर यांनी सभापती पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे अर्ज सादर केले.
या निवडणुकीत आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती पदी नगरपरिषद उपाध्यक्ष श्री. रिंकेश चवरे यांची बिनविरोध निवड झाली. पाणीपुरवठा समितीच्या सभापती म्हणून सौ. आशा आकाश महोतो यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती पदी श्री. केतन भिवगडे यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून सौ. योगिता भलावी यांची, तर उपसभापती पदी सौ. प्रियंका लक्की ठाकूर (हटवार) यांची निवड करण्यात आली. तसेच नियोजन व विकास समितीच्या सभापती पदी श्री. प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणूक प्रक्रियेस नागपूर जिल्हा ग्रामीण भाजप उपाध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जू यादव , कन्हान मंडळ अध्यक्ष श्री. बिरेंद्र सिंग, महामंत्री श्री. सचिन वासनिक, श्री. राजन विनयवार, श्री. सुरेंद्र बुधे, श्री. देवेंद्रसिंह सेंगर, कन्हान शहर अध्यक्ष श्री. महेंद्र साबरे, महामंत्री श्री. मयूर माटे यांच्यासह विनोद किरपान, सुषमा चोपकर, पूनम राठी, चिंटू वाकुडकर, सुचित्रा माटे, प्रियंका बैस ठाकूर, शक्ती पात्रे, मोनिका पौनीकर, लक्की ठाकूर, आकाश महातो, अतुल गजभिये व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
निवडणूक बिनविरोध पार पडल्याने नगरपरिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नव्याने निवडून आलेल्या सभापतींकडून शहराच्या विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

