नगरसेवक संख्या : भाजप १४ | काँग्रेस ३ | शिवसेना (शिंदे) ३
कन्हान नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत नगरपरिषद ताब्यात घेतली आहे. एकूण २० नगरसेवकांपैकी भाजपाने १४ जागांवर विजय मिळवला असून काँग्रेस व शिवसेना (शिंदे) यांना प्रत्येकी ३ जागांवर समाधान मानावे लागले.
नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र शेंदरे यांनी २,०८३ मतांच्या आघाडीने दणदणीत
विजय मिळवला.
नगराध्यक्षपदासाठी मतदान
कन्हान–पिपरी नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण २६,९७४ मतदारांपैकी १६,८२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६२.३८ इतकी नोंदविण्यात आली.
मतदानाचा तपशील पुढीलप्रमाणे —
करुणा आष्टणकर (अपक्ष) – ५४४
मधुकर नागपुरे (उबाठा) – ४०४
चंद्रशेखर पडोळे (काँग्रेस) – २,७७७
मनोहर पाठक (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित) – १,७९२
वर्धराज पिल्ले (शिवसेना – शिंदे) – ३,७५३
सतीश बेलसरे (कन्हान यूथ फाउंडेशन – अपक्ष) – ८८६
रूपेश मेश्राम (बसपा) – ६७७
राजेंद्र शेंदरे (भाजपा) – ५,८३६
नोटा – १५८
सर्वाधिक ५,८३६ मते मिळवून भाजपाचे राजेंद्र शेंदरे विजयी घोषित झाले.
प्रभागनिहाय निकाल
प्रभाग क्र. १ – योगीताताई भेलावे (भाजपा) ४७०, विनोद किरपान (भाजपा) ६५४
प्रभाग क्र. २ – प्रशांत पाटील (भाजपा) ४४६, सुषमा चोपकर (भाजपा) ४८९
प्रभाग क्र. ३ – शमशेर पुरवले (काँग्रेस) ७१२, निती तेलोते (काँग्रेस) ६६५
प्रभाग क्र. ४ – केतन भिवगडे (भाजपा) ५२१, पुनम राठी (भाजपा) ५१६
प्रभाग क्र. ५ – सुचित्रा माटे (भाजपा) ५२८, चिंटू (शिवशंकर) वाकुडकर (भाजपा) ५५२
प्रभाग क्र. ६ – रिंकेश चवरे (भाजपा) ७२३, प्रियंका हटवार (भाजपा) ६४६
प्रभाग क्र. ७ – आशा माहतो (भाजपा) ७९६, मनोज कुरडकर (भाजपा) ७९०
प्रभाग क्र. ८ – लताताई लुंढेरे (शिवसेना – शिंदे) ४०६, हरिश तिडके (शिवसेना – शिंदे) ४४६
प्रभाग क्र. ९ – रेखा टोहणे (काँग्रेस) १,०१९, जुबेर सोनू खान (शिवसेना – शिंदे) ६११
प्रभाग क्र. १० – मोनिका पौनिकर (भाजपा) ६५३, शक्ती पात्रे (भाजपा) ४३८
यामध्ये भाजपाचे एकूण १४ नगरसेवक निवडून आले.
विशेष म्हणजे, प्रभाग क्र. ९ मधून काँग्रेसच्या माजी नगरसेविका रेखा टोहणे यांनी सर्वाधिक १,०१९ मते मिळवत विजय संपादन केला.
शांततेत निवडणूक प्रक्रिया
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. मुख्य निवडणूक अधिकारी प्रियदर्शनी बोरकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक घोडके, नायब तहसीलदार रमेश पागोटे, प्रसन्न भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड व पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाजपाच्या विजयानंतर कन्हान शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे

