कन्हानमध्ये अरुणोदय सिकलसेल तपासणी मोहीम; ० ते ५० वयोगटाची युद्धपातळीवर तपासणी

कन्हान,ता.३०

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात अरुणोदय सिकलसेल तपासणी मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. ही मोहीम दिनांक १५ जानेवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुरू असून ० ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासणीनंतर संशयित व बाधित आढळणाऱ्या रुग्णांची HPLC या आधुनिक व खात्रीशीर पद्धतीने दुसरी तपासणी करण्यात येते. त्यानंतर अहवालानुसार रुग्णांना योग्य औषधोपचार, आहारविषयक मार्गदर्शन व नियमित तपासणीबाबत सूचना दिल्या जात आहेत.

  • Save


सिकलसेल हा अनुवांशिक आजार असून तो पिढ्यान्‌पिढ्या पुढे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजारात रुग्णाने आयुष्यभर काळजी घेणे आवश्यक असते. सिकलसेलचे मुख्यतः दोन प्रकार आढळतात. सिकलसेल गुणधर्म (AS) व सिकलसेल आजार (SS) असे हे प्रकार असून SS प्रकार अधिक गंभीर मानला जातो. या आजारामध्ये अशक्तपणा, फिकटपणा, ताप, वारंवार संसर्ग होणे, डोळे पिवळे पडणे, सतत थकवा जाणवणे, धाप लागणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, सांधेदुखी तसेच प्लीहा (Spleen) वाढणे अशी लक्षणे आढळून येतात.

  • Save


या मोहिमेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. एकांक्षा कानकाडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान कार्यरत आहेत. मोहिम यशस्वी करण्यासाठी डॉ. आयुषी डंभार (वैद्यकीय अधिकारी), वैशाली जगताप, सुनील गायकवाड, अतुल देशभ्रतार, प्रणिल सोनुले, हंसराज डोके (आरोग्य सहाय्यक), हरिदास वराने, राजेश गोजवंत, तावण इंगव, तिरुपती येवतम, गौतम मोनोले, आखलेव चौधरी, लुबार लांजेवार, गिलास झोडापे (आरोग्य सेवक) तसेच धनश्री खेडेकर, शारदा जोगळेकर, वेदना भोसकर, प्रेमलता कोल्हे, मंजुषा पडवेकर, अप्रियंका सानबोईर आणि कार्यक्षेत्रातील सर्व आशा स्वयंसेविका मोलाचे योगदान देत आहेत.
सिकलसेल आजाराची वेळेत तपासणी, निदान व नियमित उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link