कांद्री (कन्हान) नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून, त्यानुसार कांद्री नगरपंचायतीची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. स्थानिक राजकारणात नव्या उमेदवारांना संधी मिळणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Save


कांद्री नगरपंचायतीत एकूण मतदारसंख्या ९६२३ असून, त्यापैकी पुरुष मतदार ४८५३ आणि महिला मतदार ४७७० आहेत. नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. नूतन सरस्वती विद्यालय, जिल्हा प्राथमिक शाळा, संताजी नगर भवन तसेच विविध अंगणवाड्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

  • Save


निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर (१७ तारखेला दुपारी २ वाजेपर्यंत) असेल. अर्ज छाननी १८ नोव्हेंबर रोजी केली जाईल. अपील कालावधी १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान राहील. अपीलवरील निर्णयानंतर २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप होईल.
मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत पार पडेल, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

  • Save


निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने श्रीमती पूनम कदम आणि श्री. सचिन गाढवे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
कांद्री नगरपंचायतीच्या या पहिल्या निवडणुकीत स्थानिक विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारखे मुद्दे प्रमुख चर्चेत राहण्याची शक्यता आहे. आता नागरिकांच्या मतदानातून कोणता पक्ष पहिली सत्ता मिळवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link