कन्हान नगरपरिषदेत 27 तर कांद्री नगरपंचायत मध्ये 40 असे 67 अर्ज अवैध

कन्हान, कांदी निवडणुकित दाखल २७२ पैकी २०५ नामांकन अर्ज वैध.

कन्हान : – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीती ल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवसी कन्हान -पिपरी नगरपरिषदे सामोर प्रचंड गोंगाट, ढोल-ताशांचा दणदणाट, रॅलीं काढुन मोठ्या राजकीय पक्षाचे शक्ति प्रदर्शनाने उत्साहात पार पडले. भाजप, काँग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना (शिंदे), बसपा, राष्ट्र वादी तसेच अपक्ष उमेदवारांनी समर्थकां सोबत जल्लो षात आपले अर्ज दाखल केले.

निवडणुक प्रक्रियेस कमी कालावधी असल्याने ब-याच लोकांना अर्ज दाख ल करता आले नाही आणि अर्ज दाखल केलेल्यां काहीचे अर्ज छाननी मध्ये रद्द झाल्याने या कमी वेळे च्या कालावधीमुळे प्रशासना विषयी नागरिकांनी चांग लाच संताप व्यकत करित असल्याचे चर्चेतुन सामोर येत आहे.

  • Save

कडाक्याच्या थंडीतही संपुर्ण कन्हान, कांद्री शहरात निवडणुकीच्या रंगात वातावरण तापु लागले आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक नगराध्यक्ष पदांकरिता सोमवार (दि.१७) शेवटच्या दिवसा पर्यंत १२ नामनिर्देशित पत्र दाखल करण्यात आले असुन मंगळवार (दि.१८) ला छाननी नंतर नाम निर्देशितपत्र ०८ वैध (पात्र) तर ०४ अवैध (अपात्र) ठरले आहे. यात पात्र १) मधुकर नागपुरे (उध्दव बाळा साहेब ठाकरे पक्ष), २) राजेंद्र शेंदरे (भाजपा), ३) चंद्र शेखर पडोळे (काँग्रेस), ४) मनोहर पाठक राष्ट्रवादी कॉ. (अजित), ५) वर्धराज पिल्ले शिवसेना (शिंदे ), ६) रूपेश मेश्राम (बसपा), ७) सतिश बेलसरे कन्हान युथ फाऊंडेशन व्दारे (अपक्ष), ८) करूणा आष्टणकर माजी नगराध्यक्षा (अपक्ष), तर पक्षाचा ए बी फार्म न जोडल्याने १) राजेश यादव (कॉग्रेस), २) करूणा आष्टणकर शिवसेना (शिंदे), ३) स्नेहा मस्के (भाजप), ४) शांताराम जळते (बीआरएसपी) यांचे नामनिर्देशित पत्र अवैध (अपात्र) ठरले आहे.

  • Save

(दि.१७) ला नगरसेवक सदस्य पदाकरिता १४३ नामनिर्देशित पत्र दाखल करण्यात आले असुन (दि. १८) ला छानणी नंतर १२० नामनिर्देशित पत्र वैद्य (पात्र) ठरले तर २३ अवैध (अपात्र) ठरले आहे. असे नगराध्यक्ष व नगरसेवक सदस्या करिता एकुण नाम निर्देशितपत्र अखेरच्या दिवसा पर्यंत १५५ दाखल झाले. यात १२८ वैध असुन २७ अर्ज अवैध ठरल्याने एकाचे ०२ अर्ज वैध असल्याने एकुण १२७ अर्ज वैध आहेत.

कांद्री नगरपंचायत मध्ये एकुण ७७ अर्ज वैध

  • Save
          नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ११ नामनिर्देशितपत्रा पैकी ०६ उमेदवार वैध (पात्र) तर ०५ उमेदवार अवैध (अपात्र) ठरले आहेत. यात नगरा ध्यक्ष करिता १) सुजित पानतावणे (भाजपा), २) महेश झोडापे (कॉग्रेस), ३) गणेश पानतावणे राष्ट्रवादी कॉग्रेस, दोन अपक्ष आहेत. पक्षाचे ए बी फार्म न मिळा ल्याने भाजप ०३, कॉग्रेस ०२, अपक्ष ०१ असे ०६ अर्ज अवैध ठरले आहेत. नगरसेवक सदस्य पदासाठी दाखल झालेल्या १०६ नामनिर्देशितपत्रा पैकी ७२ उमेदवार वैध (पात्र) तर ३४ उमेदवार अवैध (अपात्र) ठरले आहेत.
 
कन्हान नगरपरिषदेत १५५ दाखल अर्जा पैकी १२८ वैध तर २७ अवैध आणि कांद्री नगरपंचाय त मध्ये दाखल ११७ पैकी ७७ वैध तर ३९ अवैद्य असे दोन्ही ठिकाणचे एकुण ६६ अर्ज छानणीत अवैध ठर ल्याने अनेक इच्छुकांमध्ये निराशा पसरली असुन वैध (पात्र) ठरलेल्या उमेदवारांनी आनंद व्यक्त केला आहे. कन्हान नगरपरिषद व कांद्री नगरपंचायत निवडणुक प्रक्रियेच्या पुढील टप्प्याची नागरिकात उत्सुकता क्षेत्रा त वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link