न्यू गोंडेगाव येथे शिवजन्मोत्सव उत्साहात; महाप्रसादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कन्हान, ता.२० “अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत” म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा न्यू गोंडेगाव येथे गुरुवार (दि. १९ फेब्रुवारी २०२६) रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • Save

यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक दलाल यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे माल्यार्पण व पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमास ग्रा.पं. सदस्य साहिल गजभिये, प्रीतम राऊत, दीपक अरुरकर, सौ. संगीताताई वरठी, सौ. रुपलिताई फरकाडे, सौ. कविताताई पाली यांच्यासह राजकुमार महल्ले, गोपाल राऊत, पांडुरंग वानखेडे, व्यंकट काळे, पांडुरंग शिंगणे, वसंता बोढारे, वामन भडंग, फुलचंद गजभिये, अजाब दलाल, विजय बोढारे आदी मान्यवर उपस्थित होते.

  • Save

तसेच मंगेश महल्ले, रामू बोढारे, अमर भारसकरे, मनोज राऊत, प्रकाश हुकुम, विनोद सहारे, दिनेश शेंद्रे, मनोज तिडके, स्वप्निल बोढारे, अजित सहारे, अनिकेत भोयर, अनिकेत देशभ्रतार, मंगेश राऊत, आयुष भडंग, अनिकेत बोढारे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Save

जन्मोत्सवानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात घेतला. आयोजकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानले.

  • Save
  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link