कांद्री नगरपंचायतीत भाजप-शिवसेनेचा दणदणीत विजय; पहिल्याच निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व

कांद्री नगरपंचायतीची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक भाजप–शिवसेना महायुतीने दणदणीत जिंकत राजकीय वर्चस्व सिद्ध केले. एकूण १७ प्रभागांपैकी भाजपाने ९ तर शिवसेना (शिंदे गट) ने ५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. काँग्रेसला २, शिवसेना (ठाकरे गट)ला १ जागेवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे संपूर्ण परिसरात भाजप-शिवसेनेच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.

  • Save


कांद्री नगरपंचायतीत एकूण ९,६२३ मतदार असून त्यापैकी ६,८६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. निवडणूक ३ नोव्हेंबरला होणार होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर झाल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे उमेदवार सुजित डोमाजी पानतावणे यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश झोडावणे यांचा १,१३६ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. सुजित पानतावणे यांना ३,५२७ मते मिळाली, तर महेश झोडावणे यांना २,३९७ मते मिळाली.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
प्रभाग १ – मीनाक्षी भुते (शिवसेना) – ८९
प्रभाग २ – सविता दिनेश राऊत (भाजप) -१८०
प्रभाग ३ – चंद्रपाल राजकुमार कश्यप (शिवसेना शिंदे) – १८२
प्रभाग ४ – नीतू राजेंद्र परते (काँग्रेस) -२१७
प्रभाग ५ – निकेश महादेव मेश्राम (काँग्रेस) – १७२

  • Save


प्रभाग ६ – शुभांगी पवन कुंभलकर (उबाठा) – १५८
प्रभाग ७ – माधुरी मोरेश्वर मस्के (भाजप) – १७४
प्रभाग ८ – शिवशंकर रामभाऊ चकोले (भाजप) – ११५
प्रभाग ९ – उमेश वाडीभस्मे (शिवसेना) – १९५
प्रभाग १० – धर्मेंद्र उर्फ बंटी सुभाष सरोदे (शिवसेना) – २९९
प्रभाग ११ – सिताराम बापुराव नाटकर (भाजप) – १६६
प्रभाग १२ – आरती रवींद्र कोटपल्लीवार – २३९
प्रभाग १३ – रिता भगवान मस्के (भाजप) – २४८
प्रभाग १४ – अतुल रमेश हजारे (भाजप) – १४१
प्रभाग १५ – संघमित्रा विकास डोंगरे (भाजप) – १२८
प्रभाग १६ – रोशनी अतुल गजभिये (भाजप) – १९२
प्रभाग १७ – राकेश कमलाकर लांजेवार (धनुष्यबाण) – २६१

  • Save


निकाल जाहीर होताच भाजप–शिवसेनेचे झेंडे फडकावले गेले, गुलाल उधळण्यात आला व विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पराभूत उमेदवारांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत असली तरी एकूणच निवडणूक शांततेत पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
विजयानंतर बोलताना नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांनी नागरिकांचे आभार मानत, “आता केवळ विकास हाच अजेंडा असून कांद्री नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू,” असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link