घरासमोरून चोरट्यांनी दुचाकी पळविली; स्वामी विवेकानंद नगरातील घटना

कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रवि विष्णूपंथ हांडे (वय ४५, रा. स्वामी विवेकानंद नगर, कन्हान) हे अंकित प्लस फार्मा कंपनी, भिलगाव (नागपूर) येथे टाटा एस वाहन चालक म्हणून काम करतात. कामावर ये-जा तसेच घरगुती वापरासाठी त्यांनी सन २०२० मध्ये मोपेड अ‍ॅक्टिव्हा (क्र. एमएच ४० सीबी १९८२) खरेदी केली होती. ते दररोज सकाळी ९.३० वाजता कामावर जात असून सायंकाळी ७.३० वाजता घरी परततात.

  • Save


शुक्रवार (दि. २६) रोजी नेहमीप्रमाणे कामावर जाऊन सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी आपली मोपेड अ‍ॅक्टिव्हा घरासमोर मोकळ्या जागेत उभी करून लॉक लावले होते. त्यानंतर कुटुंबासोबत जेवण करून सर्वजण झोपून गेले.
मात्र दुसऱ्या दिवशी शनिवार (दि. २७) डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता घराबाहेर येऊन पाहिले असता अ‍ॅक्टिव्हा त्या जागेवर दिसून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता वाहन कुठेही आढळून न आल्याने शुक्रवार सायंकाळ ते शनिवार मध्यरात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या दुचाकीची अंदाजे किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.

  • Save


या घटनेबाबत रवि हांडे यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत. शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

  • Save

call 8055616253 for more info

  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link