स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नगर पंचायत कांद्री (कन्हान)च्या वतीने मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. सुजित पानतावणे व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मा. सचिन गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम घेण्यात आली.
सात नंबर नाका, कांद्री येथून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत नगर पंचायतीचे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी दोन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा हटविण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी सचिन गाढवे, नगराध्यक्ष मा. सुजित पानतावणे, नगरसेवक अतुल हजारे, राकेश लांजेवार, सिताराम नाटकर, बंटी सरोदे, नगरसेविका रिता मस्के, आरती कोतपल्लीवार, संघमित्रा डोंगरे यांच्यासह इतर नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. तसेच लेखाधिकारी हरिचंद्र ठाकरे, स्वच्छता निरीक्षक विनोद मेहरोलिया, संजयकुमार शिंदे व नगर पंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित राहिले.
स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शहरासाठी नागरिकांनी स्वच्छतेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

