जनता मेडिकल स्टोअर्सतर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर यशस्वी

कन्हान, ता. ८ :
येथील गणेश नगर परिसरात जनता मेडिकल स्टोअर्सच्या वतीने बुधवारी (दि. ७ जानेवारी २०२६) मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांना सुलभ, दर्जेदार व वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून सौ. रुशाबी विलास निकम, सौ. गायत्री श्याम पिपलवा, के. डी. बनकर, जोगन पानतावने यांच्यासह सदस्य आंचल सिंग व कुशल डायरे उपस्थित होते.

शिबिरामध्ये विशेषतः महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर भर देण्यात आला. अनियमित मासिक पाळी, कमी अथवा अधिक रक्तस्राव, पेल्विक वेदना, असामान्य योनीस्त्राव, गर्भधारणेशी संबंधित समस्या तसेच रजोनिवृत्ती (मेनोपॉज) संदर्भातील तक्रारींवर तपासणी व योग्य मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच त्वचारोग, केस गळणे, अ‍ॅलर्जी, मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर सामान्य आजारांचीही तपासणी करण्यात आली.

  • Save

या मोफत आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कविता जादवानी व डॉ. तेजस्वी लाडी यांनी वैद्यकीय सेवा दिली. शिबिराचा लाभ घेण्यासाठी महिला व पुरुष रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

शिबिराअंतर्गत ३२ रुग्णांची बीएमडी (हाडांची घनता) तपासणी, २४ रुग्णांची रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी तसेच १७ रुग्णांची यूरिक अ‍ॅसिड तपासणी मोफत करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना वेळेत आपल्या आरोग्याविषयी माहिती मिळण्यास मदत झाली.

  • Save

यावेळी आयोजकांनी भविष्यातही अशा प्रकारची सामाजिक आरोग्य शिबिरे सातत्याने आयोजित करण्यात येतील, असे आश्वासन दिले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी व नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link