कन्हान नदीत सापडला गजराज डुबारबावने यांचा मृतदेह, मिरगीचा झटका आल्याने पाण्यात पडल्याचा अंदाज

कन्हान (S. Sarode) :– कन्हान नदीत एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख गजराज उर्फ डोमा तुकाराम डुबारबावने (३७, रा. सुदर्शन नगर, पिपरी) अशी करण्यात आली आहे.

शनिवार (दि.२५ ऑक्टोबर) रोजी गजराज डुबारबावने हे नदीकाठी गेले असता त्यांना मिरगीचा झटका आल्याने ते पाण्यात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही स्थानिकांना ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, कन्हान येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पिपरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेवर कन्हान पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास पीएसआय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे.

दरम्यान, ढिवर समाज सेवा संघटना, कन्हान तर्फे मृत डोमा डुबारबावने यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सुतेश मारबते यांच्या हस्ते पत्नी अनुसयाबाई डुबारबावने यांना रु.३,००० ची मदत करण्यात आली.

या वेळी उपाध्यक्ष बालचंद बोंदरे, कोषाध्यक्ष अॅड. श्रीकांत मानकर, सदस्य गितेश मोहने, सुरेखा भोयर, कुंदा कांबळे, तसेच कार्यकर्ते रवि खंडाटे, विकास दुधबावणे, धनराज दुधबावणे, नरेश दुधबावणे, राजकुमार खंडाटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link