कन्हान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव कन्हान परिसरात विविध संघटनांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी प्रतिमापूजन, मार्गदर्शन व प्रसाद वितरणाचे कार्यक्रम घेऊन महाराजांना मानवंदना देण्यात आली.
ढिवरपुरा आंगनवाडी, पिपरी-कन्हान
ढिवरपुरा आंगनवाडी क्र. १२६ येथे शिवजन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुनिता मानकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यक्रमानंतर पालक व विद्यार्थ्यांना बुंदीचे वाटप करण्यात आले.
राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान, टेकाडी
राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान, टेकाडीच्या वतीने हनुमान मंदिर परिसरात जयंती कार्यक्रम पार पडला. पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. गणेश मस्के यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश मोहाडे, गोविंद शेंद्रे, शिवशंकर आकोटकर, मनोहर संतापे, अनिल कडू आदी उपस्थित होते.
शिवशाही ग्रुप, वराडा
शिवशाही ग्रुप, वराडाच्या वतीने गावात जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंदिरा नागमोते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शुभम नागमोते, स्वप्निल वरखडे, कल्पना ठाकरे, सुर्वणा टाले यांनी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’च्या जयघोषात वातावरण भारावून गेले.
या कार्यक्रमांना मारोतीराव नागमोते, मेघा टाले, सुनीता घोडमारे, साधना चिखले, अमोल पुस्तकार, हर्षल टाकरे, धोंबाजी चारडे, किशोर टाले, दिवाकर जामकर, रवी टाले, सुरेंद्र गिऱ्हे, नितीन हेटे, दिलीप टाकरे, धनराज घोडमारे, अभय हेटे, उमेश चिखले, पंकज हेटे, हेमंत गिऱ्हे, शिशुपाल घोडमारे, कवडू पुस्तकार, नाना पुस्तकार, ईश्वर घोडमारे, बाळकृष्ण घोडमारे, शुभम पुंड, प्रणय गुरंदे, कैलास पुंड, बाळकुशन पारधी, अक्षय विरुरकार, बाल्या ब्रामकर, रमेश बगैतकर, उद्देश पारधी आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कन्हान परिसरात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले होते. विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित महाराजांना अभिवादन केले.

